उलवे नोड : रामप्रहर वृत्त
प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीर अण्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत रहावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 28) उलवे नोड येथे केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई व मराठी माध्यामिक विद्यालयात आयोजित ‘रयत’चे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. या वेळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर जयंती विशेष सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील जतीन सुभाष ठाकूर या विद्यार्थ्याचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, मराठी माध्यमाचे चेअरमन शरद खारकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, माजी उपसरपंच जगदिश खारकर, राजेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, एस. एम. बल्लाळ, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता गोळे आदी उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …