Breaking News

तुळशी विवाहासाठीची साहित्य खरेदी सुरू

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक सण साजरे झाले नाहीत. अनेक विवाहसुद्धा पुढे ढकलण्यात आले, मात्र आता स्थिती स्थिर असल्याने या वर्षी लग्न सोहळे जोरदार सुरू होतील. उरण बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणार्‍या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.

कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सुरुवात झाल्यावर लग्न सोहळे सुरू होतात. तुळशी विवाहासाठी प्रामुख्याने उसाची डांबी, बोरे, आवळा, चिंच यांना विशेष मागणी असते. पूजेला या वस्तू महत्त्वाच्या मानल्या जातात. उसाची काडी 20 रुपयास एक, बोरे, आवळा, चिंच असा वाटा 10 रुपयास एक वाटा अशा दराने आम्ही विकतो, असे विक्रेती मीना राठोड यांनी सांगितले.

दरवर्षी आम्ही तुळशी विवाहासाठी ब्राह्मण बोलवितो. विवाह सोहळा करतो. गेल्या वर्षी सोहळा केला नाही, परंतु यंदा कोरोनाची स्थिती स्थिर असल्याने चांगल्याप्रकारे तुळशीचा लग्नसोहळा करू.

-रमेश टेमकर, बोरी, उरण

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी …

Leave a Reply