Breaking News

नवघरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश वाजेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदींनी केले स्वागत

उरण : बातमीदार

उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश (रवि) वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उरण मधील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. तेव्हा पासून गणेश वाजेकर अस्वस्थ होते. शेवटी विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाने गणेश वाजेकर यांनी भाजपमध्ये जाहिरपणे पक्ष प्रवेश केला.

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पळस्पे सरपंच चंद्रकांत भोईर, सुधीर घरत, जयप्रकाश पाटील, महेश कडू, शेखर तांडेल, सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश वाजेकर यांनी जाहिर पक्ष प्रवेश केला. या वेळी धर्मेन्द्र माळी, योगेश तांडेल, प्रमोद तांडेल, साईनाथ पाटील, धर्मेन्द्र तांडेल, जयदास तांडेल, हसुराम तांडेल, गणेश कडू, रोशन भोईर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

गणेश वाजेकर हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. आता मात्र जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर हे भाजपमध्ये गेल्याने गणेश वाजेकर यांनीही भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. गणेश वाजेकर यांची घरवापसी झाल्याने आमदार महेश बालदी यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण नवघर गाव तसेच जिल्हा परिषद मतदार संघ भाजपमय करणार असल्याचा निश्चय विजय भोईर यांनी या वेळी केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply