Breaking News

तोंडरे येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

तोंडरे येथे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजर रायगड जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय जनता पक्षाबाबतचा विश्वास वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर जनतेच्या सेवेसाठी तोंडरे विभागात महेश पाटी यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, हरेश केणी, तेजस कांडपिळे, दिनेश खानावकर, सचिन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, श्रीनाथ पाटील, नितळसचे माजी सरपंच कैलास मढवी, राजकुमार म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, सुदेश फडके, संतोष गोंधळी, धर्मा पावशे, तोंडरेचे माजी सरपंच अमृता पाटील, गोरक्ष पाटील, अभिमन्यु पाटील, हरी फडके, राघो पाटील, चंद्रकांत पाटील, भगवान पाटील, काळुराम फडके, जयवंत पाटील, अंकुश डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply