Breaking News

जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार

रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त   रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि. बा. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे.

हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण घाग यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद घेतला. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या घरी त्यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराची माहिती त्यांचे पुत्र अतुल पाटील व कुटुंबीयांना दिली. त्यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस व कामगार नेते सुरेश पाटील विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ व श्री अरुण घाग रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख, लेखनिक सुरेश ठाकूर यांनी आशीर्वाद घेतला व दसर्‍यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply