शेकापच्या भूलथापांना जनता कंटाळली -शैलेश माळी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात येत्या रविवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी होणार्या एकमेव खेरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून यात भाजपने मुसंडी मारली आहे. 25 वर्षांपासून भोळ्याभाबड्या ग्रामस्थांची फसवणूक करणार्या शेकापची सत्ता उलथवून टाकण्याचा ग्रामस्थांनीही निर्धार केल्याचे पहावयास मिळत आहे, असे भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार शैलेश माळी यांनी सांगितले. खेरणे ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य व थेट सरपंच मिळून 12 संख्या आहे. भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार शैलेश माळी आपल्या सहकार्यांसोबत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शैलेश माळी त्यांना त्यांचे काका बुधाजी माळी यांचा राजकीय अनुभव आणि गावातील नागरिकांची मोलाची साथ मिळत असल्याने ते खेरणे ग्रामपंचायतीचा गड जिंकतील, असे चित्र दिसते. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 1मधून रूपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी, प्रभाग क्रमांक 2मधून सुरेखा रंजीत गोंधळी, प्रिया विलास गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, प्रभाग क्रमांक 3मधून अक्षता सचिन पाटील, सुभद्रा संतू माळी, राजेश रामा माळी, प्रभाग क्रमांक 4मधून संतोष मुरलीधर गोंधळी, प्रतिभा राजेश माळी, महेश नागेश माळी सदस्यपदासाठी मैदानात आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शेकापची 25 वर्षांची जुलमी सत्ता उलथून नागरिकांना हक्काची ग्रामपंचायत मिळणार आहे. भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार शैलेश माळी हे सर्वसामान्य जनतेला समजून घेणारे असून गावचा कायापालट करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. शेकापच्या 25 वर्षांच्या राजवटीत गावकर्यांना पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी मुलांच्या शिक्षणासाठी लागणार्या दाखल्यापर्यंत झगडावे लागत आहे. गावात कराच्या रूपाने करोडो रुपये जमा होत असताना गावाला मात्र अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शैलेश माळी व सहकार्यांच्या विजयाने सर्व समस्यांपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. गावकर्यांना बदल हवा आहे. त्यामुळे खेरणे ग्रामपंचायतीवर कमळ फुलेल, असा विश्वास बुधाजी माळी यांनी व्यक्त केला.विरोधकांच्या मनमानी कारभाराला वाचा फोडण्यासाठी आणि ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शुक्रवारी (दि. 14) प्रचारातून करण्यात आले. या वेळी बुधाजी माळी, काशिनाथ गोंधळी, वामन माळी, कृष्णा गोंधळी, अरविंद गोंधळी, अनिल गोंधळी, ज्ञानदेव गोंधळी, गुरूनाथ गोंधळी, रमेश माळी, प्रदीप माळी, नरेश माळी, चाहू माळी, कृष्णा गोंधळी, धोंडीराम पाटील, शनिवार पाटील, जगदिश गोंधळी, बबन गोंधळी, भास्कर माळी, गणपत मढवी, वासुदेव माळी, रवींद्र गोंधळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.