भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामस्थांची काशीला जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. आपल्या सरपंचपदाचे मानधन आणि स्वखर्चातून सरपंच सदाशिव रामदास वास्कर यांनी आणि श्री काशी विश्वनाथ मित्र मंडळाने ही जनसेवा केली. हे सर्व यात्रेकरू घरी सुखरूप परतले. त्यानिमित्त कुंडेवहाळ येथे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सपत्नीक भेट देत दर्शन घेतले तसेच यात्रेकरूंचा सन्मान केला. कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव रामदास वास्कर आणि श्री काशी विश्वनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून काशी येथे सर्वांची राहण्या-खाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. या यात्रेकरूंनी काशी विश्वेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी कुंडेवहाळमधील 200 लोक हे रेल्वेगाडीने काशी येथे गेले होते. त्यामध्ये वयोवृद्धांचाही समावेश होता. दरम्यान, हे सर्व यात्रेकरुन सुखरूपणे घरी परतले असून त्यानिमित्त कुंडेवहाळ गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जेडब्ल्यूआर कंपनीचे मालक ललित शेठ, पंढरीशेठ फडके, नंदराज मुंगाजी, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशीव वास्कर, खोपटे ग्रामपंचायतीचे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, दापोली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशाली प्रकाश डाउर, उपसरपंच पन्कलेश डाउर, सदस्य समाधान घोपरकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे, रंजना सदाशिव वासकर, सुनिता रेवनाथ पाटील, विक्रम महाराज थोरवे, अमित राम वास्कर, डॉ. मनीषा गांगरे, रमण वास्कर आदी उपस्थित होते.