उरण : बातमीदार, प्रतिनिधी
उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे प्रत्येक महिन्यातील 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता मधुबन कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)च्या माध्यमातून कविसंमेलन भरविले जाते. या वेळी सोमवारी (दि. 17) विमला तलाव येथे 84वे कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह झाले. या वेळी कवी, साहित्यिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत मुकादम, स्वागताध्यक्ष राम म्हात्रे होते. समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मोहनलाल म्हात्रे, बल्लाळ श्रीराम वैशंपायन यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थित कवी रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, संजय होळकर, भ. पो. म्हात्रे, अनंत पाटील, कवीश्री अरूण म्हात्रे, सि. बी. म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, राम म्हात्रे, मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी सुंदर अशी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार कवी मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी मानले.