दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली
उरण : वार्ताहर
भारिप बहुजन महासंघ उरण तालुका व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला, तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उरण चारफाटा ते तहसीलदार कार्यालय असा कँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये भारिप बहुजन महासंघ उरण शाखा तालुका अध्यक्ष रामनाथ बन्सी झिने, उपाध्यक्ष उत्तम कांबळे, सरचिटणीस मधुकर पवार, कोषाध्यक्ष दिनेश राठोड, संघटक तुकाराम खंडागळे, युवक अध्यक्ष भूपेश पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ससाणे, चिटणीस सुरज पवार, कोषाध्यक्ष नागोराव खराटे, सरचिटणीस रमेश पोटफोडे आदी उपस्थित होते. या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर व तहसीलदार कल्पना गोडे यांना निवेदन देण्यात आले.