Breaking News

शासनाच्या आनंदाचा शिधा वितरणास पनवेलमध्ये प्रारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील आसुडगाव गावात राज्य शासनाच्या आनंदाचा शिदा वितरण कार्यक्रम भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 21) झाला. या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे सात कोटी सर्वसामान्य नागरिकांना चार वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे.
राज्यातील गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल स्वस्त दरात म्हणजेच 100 रुपयांमध्ये मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सर्व रेशनिंग दुकांनावर या चारही जीवनावश्यक वस्तू पोहचल्या आहेत. दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे एक कोटी 62 लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार पनवेलमधील आसुडगावात वितरणाला सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमास तहसीलदार विजय तळेकर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका शशिकला शेळके, भाजप ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे, आसुडगाव सर्कल श्री. मोहिते, तलाठी आरती रेवसकर, माजी सरपंच शशिकांत शेळके, हरिश्चंद्र म्हात्रे, दशरथ शेळके, हसन अण्णा यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply