Friday , June 9 2023
Breaking News

सोनारीत क्रिकेटचा महासंग्राम

उरण : वार्ताहर

रायगड जिल्ह्यातील मानाची माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील सोनारी येथे रंगली. सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू व दिनेश तांडेल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटन समारंभास जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

स्पर्धेत नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या  दर्जेदार खेळाचे धावते समालोचन चंद्रकांत शेटे, प्रसाद भोईर, अमित म्हात्रे, अतिश पाटील यांनी केले.

महेश कडू हे उरण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असल्यामुळे ते व असोसिएशनचे अन्य पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून एक गाव 11 खेळाडू हे मुख्य वैशिष्ट्य स्पर्धेत पाहावयास मिळाले. सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शविली.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply