Breaking News

अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात

सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : प्रतिनिधी
100 कोटी वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज शुक्रवारी (दि. 21) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोर्टाने फेटाळला. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरूंगातच जाणार आहे.
अनिल देशमुख गेल्या 11 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) दोघांनीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या गुन्ह्यामध्ये देशमुखांना जामीन मिळाला, मात्र याच प्रकरणात त्यांच्यावर सीबीआयनेही गु्हा दाखल केला असल्याने त्यांना तुरूंगात राहावे लागले. त्यानंतर शुक्रवारी सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय या प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केले.
राऊतांच्या जामीन अर्जावर आता 2 नोव्हेंबरला सुनावणी
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊत यांची दिवाळी तुरूंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असे कोर्टाला सांगितले. त्याची नोंद घेत कोर्टाने 2 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे, कारण पुढचा आठवडा दिवाळीमुळे कोर्टाचे नियमित कामकाज बंद असेल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply