धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर सोमवारी (दि. 21) दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. गेटमन म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करीत होते. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने समोरून कांबळे यांच्यावर गोळी झाडली. कपाळावर गोळी लागल्याने कांबळे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला.
गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित साबळे व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची सर्व बाजूंनी नोंद घेणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper