पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के. दिवाकर, संघटनमंत्री सुशील जोशी, प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा यांच्यामार्फत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खारघर तळोजा मंडल सोशल मीडिया संयोजक अजय माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना मोफत मास्क, औषधे व सॅनिटायझरचे वाटप डी-मार्ट, खारघर पोलीस ठाणे, खारघर वाहतूक विभाग या ठिकाणी करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आर. के. दिवाकर, सुशील जोशी, संतोष शर्मा, भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सोशल मीडिया उत्तर रायगड जिल्हा सह-संयोजिका मोना आडवाणी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते समीर कदम, राजेंद्र मांजरेकर, मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी, विपुल चौटलिया, अजय माळी, वैशाली प्रजापती, नीलम विसपुते, अंकिता वारंग, अमित अगरवाल, सुशील तिवारी, सोनू पांडे, पंकज सिंह आदी उपस्थित होते.