Breaking News

भाजप कामगार मोर्चातर्फे धन्यवाद मोदीजी अभियान

पनवेलमध्ये प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली 15 लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे धन्यवाद मोदीजी अभियान भाजपने सुरू केले आहे. कामगार मोर्चाच्या वतीनेही धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा आठ दिवस प्रवास करून यात्रा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील पोहचली. यानिमित्त भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी व पदाधिकार्‍यांची बैठक झाली.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा, महिला, कामगार, शेतकरी यांच्यासाठी राबविलेल्या शेकडो कल्याणकारी योजनांमुळे कोट्यवधी देशवासीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वांना देणे व त्या माध्यमातून मोदीजींना धन्यवाद देणे यासाठी भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्रतर्फे प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांनी हे अभियान चालविले आहे. 14 जिल्ह्यांत प्रवास करून ही यात्रा रविवारी (दि. 6) रायगडात आली.
पनवेलजवळील पळस्पा फाटा येथे कामगार मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी शेकडो कार्यकर्ते व कामगारांसमवेत प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे व अन्य पदाधिकार्‍यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मग मिरवणुकीने पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात येऊन तेथे सभा घेण्यात आली. कामगार नेते जितेंद्र घरत यांनी आपल्या स्वागतपर भाषणात जिल्ह्यातील कामाचा आढावा घेताना योजना कशा प्रकारे राबविण्यात आल्या याची माहिती देऊन जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न मान्यवरांपुढे मांडले.
प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी आपल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेल्या योजनांची माहिती देऊन कामगार कायदे व त्यामुळे कामगारांना होणारे फायदे याची माहिती देत कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांना आम्ही न्याय देऊ, असे अभिवचन दिले. या कार्यक्रमात गणेश ताठे यांनी जितेंद्र घरत यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चिटणीसपदी घेत असल्याचे व कोकण विभागाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे घोषित केले. बहारदार व जोशपूर्ण झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगडचे सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे यांनी केले, तर आभार रवींद्र कोरडे यांनी मानले.
या दौर्‍यात प्रदेश कार्यकारिणीतील सरचिटणीस प्रमोद जाधव, हनुमंत लांडगे, उपाध्यक्ष चंद्रकांत महाडिक, विनोद शहा, सदस्य मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. याशिवाय जिल्ह्यातील पदाधिकारी समिरा चव्हाण, चित्रपट कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष नेत्रा राणे, उपाध्यक्ष अरुण घोडके, चिटणीस जगदिश म्हात्रे, संतोष घरत, अल्ताफ शेख, रवींद्र पाटील, अनिल कर्णूक, चंद्रकांत कडू, पंढरीनाथ दरेकर, तसेच तळोजा एमआयडीसीमधील डाऊ केमिकल, हायकल लिमिटेड कंपनी, बाल्मर लॉरी, केमस्केप केमिकल, खोपोली येथील हर्क्युलस होईस्ट, पाताळगंगा एमआयडीसीतील इदेमित्स्यु ल्युब इंडिया, आष्टे लॉजिस्टिक, गती केडब्ल्यूई, उरणमधील आयओटीएल आदी कंपन्यांमधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply