Breaking News

भ्रष्टाचारी तटकरेंना एक दिवस जेलची हवा खावी लागेल

अनंत गीते यांचे प्रतिपादन; चौल येथे जाहीर सभा

रेवदंडा : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघात स्वार्थासाठी आघाडी करण्यात आल्याचा आरोप करून सुनील तटकरे भ्रष्टाचारी असल्याने महायुतीस आव्हानाचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस रायगडमधून नामशेष करावयास निघालेल्या तटकरेंना जनता कधीच विसरणार नाहीच, परंतु 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍या तटकरेंना एक दिवस जेलची हवा खावी लागेल, असे सडेतोड भाष्य शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय अवजड उदयोग मंत्री अनंत गीते यांनी केले. ते शनिवारी (30) चौल येथील जाहीर सभेत बोलत होते.

चौल पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात झालेल्या सभेस शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा राजिपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, रेवदंडा अर्बन बँकेचे चेअरमन वामन घरत, शिवसेनेचे अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, विजय कवळे, संपर्क प्रमुख सतिश पाटील, दीपक रानवडे, विकास पिंपळे, जेष्ठ शिवसैनिक विश्वनाथ मळेकर, नारायण मुंबईकर, मारुती भगत, आक्षीचे माजी सरपंच शंकर गुरव, चौलच्या सरपंच प्रतिभा पवार, माजी सरपंच रूपाली म्हात्रे, उपसरपंच अजित गुरव, अजित पाटील आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी म्हात्रे, दळवी, अ‍ॅड. मोहिते, दांडेकर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचलन विकास पिंपळे यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply