उरण : बातमीदारी
दिल्ली येथे नुकतीच दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पनवेल, पेण व माणगाव तालुक्यातील चार खेळाडूंनी सहभाग घेत पदके जिंकली
स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रितिका सिंग, टेक्निकल कमिटी वाको चेअरमन रोमिओ देसा (क्रॉटिया), रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको चेअरमन युरी लक्टिकोव (इस्टोनिया) यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत तीन देशांतील 800पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत रायगडातील सौम्या पिंपळेने दोन सुवर्ण, ऋग्वेद जेधेने सुवर्ण व कांस्य, अस्मि गुरवने सुवर्ण आणि केदार खांबेने कास्यंपदक जिंकले. महाराष्ट्र राज्याच्या टीमला अध्यक्ष निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. भारताचे कोच जयेश चोगले तसेच अम्याचुअर किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनीही मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …