सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी स्वीकारला पदभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खेरणे ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम होते. ते मोडीत काढत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विराजमान झाले आहेत. सरपंच शैलेश माळी आणि उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. 11) पदभार स्विकारला. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सरपंच आणि उपसरपंचांचे अभिनंदन केले. या वेळी रॅली काढून जल्लोष केला. या वेळी भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील, शिवाजी दुर्गे, प्रकाश खैरे, उपसरपंच राजेंद्र अत्माराम गोंधळी, सतिश तांबडे, के. के. गोंधळी, के. एन. गोंधळी, प्रकाश खैरे, काशिनाथ माळी, बुथ अध्यक्ष रुपेश म्हात्रे, नायब तहसीलदार संभाजी शेलार, ग्रामसेविका प्रतिभा पुंडलिक वानखेडकर, मंडल आधिकारी संतोष कचरे, बुधाजी माळी, भास्कर माळी, अनिल गोंधळी, प्रदीप माळी, चंद्रकांत गोंधळी, रमेश माळी, नरेश माळी, रोहिदास पाटील, शनिवार पाटील, अरविंद गोंधळी, नामदेव पाटील, वासुदेव फडके, अरुण माळी, बाळाराम माळी, दिनेश गोंधळी, ज्ञानदेव गोंधळी, रामा माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.