Breaking News

प्रामाणिक व्यक्तींना चौकीदारावर विश्वास : पंतप्रधान मोदी

कुरूक्षेत्र : जे लोक गरिबांना लुटत होते, त्यांना यंत्रणेतून हटवण्यात आले आहे. आज प्रामाणिक लोकांना चौकीदारावर भरवसा आहे, पण जे लोक भ्रष्ट आहेत त्यांना माझ्यापासून त्रास आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना उद्देशून लगावला. कुरूक्षेत्र येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. महाभेसळीत (महाआघाडीत) जितके चेहरे आहेत. ते सर्व लोक न्यायालय, सीबीआय आणि मला शिव्या देण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचा आरोप मोदी यांनी केला. या वेळी त्यांनी नायजेरियातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तुम्ही लोक येथे अभ्यास दौर्‍यावर आलात याचा मला आनंद आहे. तुम्ही येथे स्वच्छ भारत अभियानाची माहिती घेण्यासाठी आले आहात. भारतात या मोहिमेचे काम कौतुकास्पद आहे. मला आशा आहे, नायजेरियातही या अभियानाला प्रोत्साहन मिळेल.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply