Breaking News

माणगावात शेतकरी कुटुंबांचा सन्मान

माणगाव : प्रतिनिधी

जागतिक शेतकरी दिनानिमित्त किसान क्रांती संघटनेतर्फे सोमवारी (दि. 23) सकाळी माणगावातील कुणबी भवनात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील 125 शेतकरी बांधवांचा कुटुंबांसमवेत संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष टी. एस. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष संतोष पवार यांनी केले. संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष संतोष पवार यांची यावेळी संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना टी. एस. देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात मान्यवरांनी उपस्थित शेतकर्‍यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर, खजिनदार सुरेश म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष विनोद दळवी, माथाडी कामगार संघटनेच्या माणगाव तालुका अध्यक्षा शर्मिला सत्वे, कृषी विज्ञान केंद्राचे मनोज तलाठी, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जैविक शेती तज्ज्ञ दत्तात्रेय रणदिवे, गीन रिच ग्रो इंडिया (चेन्नई) चे रिजनल हेड लक्ष्मीनारायण कामत यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होते.

शेतकरी मेळावा यशस्वितेसाठी गणेश चाचले, महीपत मांजरे, संतोष शिंदे, रमेश शेडगे, विजय कोंडे, बापू बक्कम, भास्कर गावडे, बाबू पालकर, भगवान शिंदे, रघुनाथ गोसावी, बाबुराव नासकर व सहकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply