पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडीतील शेकाप कार्यकर्ते असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 12) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेकापचे रोहिदास वाघे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव आणि भगीनींनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, सागर आंग्रे, सुनील भोईर, तुषार नागे, सुरज शेलार, अतिश साबळे, जनार्दन फडके, रवी राजपूत आदी उपस्थित होते.
या वेळी बंदू देवजी वाघे, वेगू देवजी वाघे, गोविंद वाघे, राधिका वाघे, सुदाम वाघे, तुळसा वाघे, रोहिदास वाघे, वनिता वाघे, गंगा वाघे, बंधू पवार, उज्ज्वला पवार, सुमन पवार यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या सर्वांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.