Breaking News

विकासकामांचे श्रेय पालकमंत्री व जिल्हाध्यक्षांनाच -देवेंद्र साटम

कडाव : प्रतिनिधी

विधानसभेच्या कर्जत-खालापुर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत तर अनेक कामे मंजूर झाली आहेत. ही विकासकामे आणण्याचे श्रेय पालकमत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आहे, असा दावा भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी गुरुवारी (दि. 4) केला.

भाजपच्या कर्जत मंडळाची मासिक बैठक गुरुवारी येथील भाजपच्या प्रेरणा सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत देवेंद्र साटम उपस्थितांना मार्गदर्शन करीत होेते. पक्षाच्या कार्यविस्तारासाठी आखून दिलेल्या कार्यक्रमांचे तंतोतंत पालन करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

केंद्र व राज्यातील भाजप प्रणित सरकारने गेल्या पाच वर्षात विविध योजना राबविल्या असून, त्याचा जनसामान्यांना लाभ होत आहे. यासंदर्भातील माहिती पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन साटम यांनी यावेळी केले.

युवा मोर्चाचे निलेश पिंपरकर, किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, अ‍ॅड. ऋषिकेश जोशी यांनी या बैठकीत ग्रामपंचायत निहाय नवीन मतदार नोंदणी, भाजप प्राथमिक सदस्यत्व अभियान, शक्ती केंद्र निहाय विस्तारक योजना, बुथ कार्यकर्ता संमेलन व रक्षाबंधन पर्व या संदर्भात माहिती दिली. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे तसेच किरण ठाकरे, संजय सावला, प्रविण पोलकम, स्वप्निल खंबाळे, संतोष भोईर, ज्ञानेश्वर भगत, परशुराम म्हसे, माधव कोळंबे, दिनेश रसाळ, विलास श्रीखंडे, आनंद सकपाळ, सुगंधा भोसले, बबिता शेळके आदी बैठकीला उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply