Breaking News

अलिबागच्या लाचखोर तहसीलदारांकडे आढळले घबाड; झडती सुरूच

अलिबाग ः प्रतिनिधी

लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सातबार्‍यावर नाव चढविण्यासाठी तहसीलदार दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर दोन लाख देण्याचे ठरले तसेच ही रक्कम त्यांनी हस्तक राकेश चव्हाण याच्याकडे जमा करण्यास सांगितले होते. रायगड बाजारसमोरील एका दुकानात हस्तकाने ही रक्कम शुक्रवारी स्वीकारली. या वेळी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी चव्हाणसह दळवी यांना अटक करण्यात आली असून या दोघांना विशेष सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply