मोहोपाडा : प्रतिनिधी
लोणावळा येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली रन 2022 क्लास एफ-3 या वेगवान व्हिली भारतीय मोटरसायकल स्पर्धेत खालापूर तालुक्यातील रिस येथील तरुण व प्रिआ स्कूलचा विद्यार्थी वेदांत
सुधीर शिंदे याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे याचा चिरंजीव असून या यशाबद्दल त्याचा गणेशनगर येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
वेदांत हा 550 सीसी मोटरसायकल चालवितो. विशेष म्हणजे महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतर एका चाकावर मोटरसायकल चालविणारा वेदांत जिल्ह्यातील एकमेव वेगवान चालक असावा. त्याच्या सत्कार समारंभाला रसायनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अश्वनाथ खेडकर, उपनिरीक्षक सुधीर शिंदे माजी सरपंच संदीप मुंढे, कृष्णाशेठ पारंगे, युवा नेते अंकित साखरे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते. सर्वांनी वेदांतचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …