Breaking News

उलवे नोड : न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल सेतू प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत आदी सोबत उपस्थित होते. या वेळी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गौरव कोळी, भाजप अध्यक्ष श्याम कोळी, पांडुरंग कोळी, रवींद्र कोळी, सुशील कोळी आदींनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना धन्यवाद दिले.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply