पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 7 ते 18 नोव्हेंबरदरम्यान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते बालदिनी झाले.
उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार समीर देसाई, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, माजी जि. प. सदस्य सुमन कुंभार, माजी पं.स.सदस्य यशवंत कासार, सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक चित्रे, विभावरी चित्रे, कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ, क्रीडा शिक्षिका शुभांगी उतेकर, रंजना जाधव, दीपक सकपाळ आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना चंद्रकांत कळंबे म्हणाले की, आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार नजिकच्या काळात रानबाजिरेतील एमआयडीसी धरणालगतचे भूसंपादित क्षेत्र तीन कोटी खर्चाच्या क्रीडासंकुलासाठी निश्चित करण्यात येणार आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …