Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकरी, आदिवासी समाजातील लोकांना पूर्वी शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 15) केले.
आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून पनवेल तालुक्यातील नेरेजवळील गाढेश्वर मंदिर येथे साजरा करण्यात आला. वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती लाभली. त्या वेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्य चळवळीबरोबरच आदिवासी समाजाच्या हितासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीशांविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. या महापुरुषाचे 146व्या जयंतीनिमित्त स्मरण करून अभिवादन करण्यात आले. वनवासी कल्याण आश्रमाचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उदय टिळक, प्रमुख वक्ते कृषी शिक्षक अशोक भगत, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, शांताराम चौधरी, वाजे सरपंच राजेश भालेकर, दुंदरे सरपंच अनुराधा वाघमारे, मालडुंगी सरपंच हर्षदा चौधरी, एकनाथ वाघे, मोहन मुजुमदार, विष्णू सफरा, रमेश भिडे, विष्णू वाघमारे, सुधीर कांडपिळे, नारायण भगत, सुरेश वाघे, सुदाम पवार, संदीप शिंदे, गणपत भगत, गुरूनाथ ढुमणे, गजानन कातकरी, राजेश भोईर, अनिता सफरा, लता भगत, बेबी भगत, रत्नाकर जाधव, लक्ष्मण शीद, पद्माकर वाघ, शांताशेठ शेळके, जोमा निरगुडा, जनार्दन निरगुडा आदी उपस्थित होते.
शिकून मोठे होण्याची इच्छा, जिद्द मनात असणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार निश्चितपणे पाठबळ देईल असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व घटकांसाठी काम करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शौचालय, घर उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता काळानुरूप तुम्हालाही बदलावे लागेल. त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजातील भगवान बिरसा मुंडा ते आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करून त्यांचा आदर्श घेऊन उत्कर्ष साधावा, असे आवाहन केले.
इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली, तर प्रमुख वक्ते कृषी शिक्षक अशोक भगत यांनीदेखील मार्गदर्शन केले. आदिवासी समाजातून एमएबीएड झाल्याबद्दल दत्तात्रेय घुटे आणि बीई इलेक्ट्रॉनिक्स झाल्याबद्दल प्रमिला भगवान ढुमणे यांचा या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply