Breaking News

कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात

पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान

पनवेल ः वार्ताहर

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. याची सामाजिक जान ठेवत पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजूंना खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सांगितले की, संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी वर्गणी काढून हप्त्यातून दोन दिवस अन्नधान्य वाटप करण्याचे ठरविले आहे. पनवेल, नवीन पनवेल परिसरात कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना दररोज चहा-बिस्कीट, पाणीवाटप करण्यात येणार आहे. आम्हाला पनवेलमधून प्रतिसाद वाढत आहे. या सामाजिक कामासाठी युग प्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या पनवेलच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले. असाच प्रतिसाद सर्वांनी देऊन संस्थेला या सामाजिक कामात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या सामाजिक कार्यासाठी पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, कमिटी सदस्य अमेय इंगोले, रामदास खरात, हेमा रोड्रिंक्स, संतोष जाधव, वल्ली महमद शेख, संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे आदींसह रहिवासी दीपक खरात, विनोद इंगोले, कडबा गाडगे, अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे, संजय तायडे, जूम्मनभाई, संजीव ठाकूर, अमन तायडे, अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे, उमेश पलमाटे, अनिल वानखेडे, धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके, रोहित चव्हाण आदींनी मेहनत घेतली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply