Breaking News

120 अश्वशक्तीच्या नौकांनाही मिळणार डिझेल परतावा

आमदार रमेश पाटील यांनी मानले शासनाचे आभार

मुरूड : प्रतिनिधी

राज्यातील 120 अश्वशक्ती क्षमतेच्या नौकांना डिझेल परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याबद्दल मच्छीमार आणि मच्छीमार सहाकरी संस्थांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल कोटा व मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती (परतावा) बंद करण्यात आला होता. त्याला मच्छीमार आणि संस्थांनी जोरदार विरोध केला होता. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर कोळी महासंघाचे अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले दिले होते. राज्य शासनाने 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांदेखील डिझेल पुरवठा आणि डिझेल परताव्यासाठी पात्र असल्याचा निर्णय घेतला. आज तशी अधिसूचनाही काढण्यात आली. त्याबद्दल कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके तसेेच भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

राज्य शासनाने 120 अश्वशक्ती क्षमतेच्या नौकांनाही डिझेल परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणातील समस्त कोळी बांधव राज्य शासनाप्रती आभार व्यक्त करत आहेत.

-रमेश पाटील, आमदार, भाजप

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply