Breaking News

एनएमएमटी, बेस्ट थांब्यांवर गर्दुल्ल्यांचे बस्तान

नेरूळमधील अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाकडून नेरूळमधील विविध ठिकाणी बसथांबे-डेपो उभारले गेले, पण या बसथांब्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रवासी असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्या ठिकाणी चक्क भिकारी, बेघर नागरिक व नशापान करणारे व्यक्ती वामकुक्षीचा आनंद घेत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बसथांब्यावर वाट पहावी लागते. प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना ताटकळत उभे रहावे लागू नये म्हणून आरामदायी बस शेल्टरची परिवहन उपक्रमाकडून निर्मिती करण्यात आली आहे, परंतु काही बस शेल्टरमध्ये प्रवासी बसलेले दिसत नाही, पण ज्याचा काहीही संबंध नाही असे घटक आराम करताना आढळून येत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

बस शेल्टरमध्ये आराम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना उठवायला गेल्यास ते उठत नाहीत. अशांना मज्जाव केल्यास प्रवाशावरच धावून जातात. प्रवासी मात्र त्यांच्याशी वाद न घालता बसथांब्याच्या लगत उभे राहून बस येण्याची वाट बघत असतात. यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः नेरूळमधील बांचोली चौकजवळीक बस स्टॉप, नेरूळ सेक्टर 3मधील बसस्थानक, सारसोळे बसस्थानक आदी ठिकाणी सर्रास भिकारी, गर्दुल्ले आणि उपद्रवमूल्य नागरिकांनी बस्थान मांडलेले पहावयास मिळते.

आता थंडीचा हंगाम सुरू झाला  आहे. त्यामुळे ठीक आहे, पण ज्या वेळी उन्हाळा वा पावसाळी कालावधी सुरू होईल त्या वेळी प्रवाशांना शेल्टरमध्ये बसावे लागेल. म्हणून आराम करणार्‍या घटकांवर परिवहन उपक्रमाने कारवाई करावी  तसेच काही बस डेपोत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, अशी मागणी प्रवासीवर्ग करत आहे.

बस शेल्टरमध्ये आराम करणारे नागरिक जागा अडवत असतील तर त्यावर कारवाई करण्यास सांगितले जाईल तसेच सारसोळे बस डेपोतीलप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. -योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम, पालिका

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply