Saturday , December 3 2022

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाची इंडस्ट्रियल व्हिजिट

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारी (दि. 24) एक दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
या भेटीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बंदरामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत आयात व निर्यात, व्यापार याविषयी प्रात्यक्षिक माहिती मिळवणे हे होते. महाविद्यालयातील सुमारे 31 विद्यार्थी व चारप्राध्यापक या औद्योगिक भेटीमध्ये सहभागी झाले होते. त्या भेटीचे औचित्य साधून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे भेट दिली व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रामध्ये असणार्‍या विविध संधी याविषयी मोलाची माहिती घेतली. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या.
या औद्योगिक भेटीचे आयोजन व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. रीत ठुले यांनी केले व प्रा. विशाल देशमुख, प्रा. डॉ. धनवी आवटे, प्रा. भाग्यश्री शुक्ला यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे या सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …

Leave a Reply