Breaking News

जासई उड्डाणपूल 2023मध्ये खुला

रखडलेले काम लवकरच होणार पूर्ण, नव्या सरकारच्या कार्यवाहीमुळे वेग

उरण : प्रतिनिधी

उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणार्‍या उड्डाणपूल मार्च 2023ला हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणारा असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील प्रवासी व वाहतूकदार यांनी आनंद व्यक्त केला आहे. जासई येथील उड्डाणपुलाचे काम काही वर्षांपासून रखडले होते, मात्र शिंदे-फडणवीस सरकारमुळे या पुलाच्या कामांना वेग आला असून पुढील वर्षात हा पूल होणार आहे. उरण पनवेल व नवी मुंबई या मार्गावरून रोजची प्रवासी वाहतूक होत आहे, मात्र या मार्गावर उरण ते जासई तसेच गव्हाण फाट्यापासून पुढील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जासई नाका ते गव्हाण दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील काही वर्षे रखडले आहे. रस्त्याच्या कामामुळे जासई ते गव्हाण या दीड किलोमीटर च्या मार्गावर प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नवी मुंबई, पनवेलला शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी, कामगार तसेच व्यावसायिक यांनादेखील वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जासई येथील दास्तान ते शंकर मंदीर असा 1.2 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे, मात्र हा उड्डाणपूल मागील काही वर्षांपासून रखडला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या दरम्यान एक अपघात ही झाला होता. जासई उड्डाणपुलाचे काम येत्या मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय)चे अधिकारी यशवंत घोटकर यांनी दिली. दरम्यान, राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस हे जनेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. नागरी समस्या सोडविण्याकडे या सरकारचा कल अधिक असल्याने विविध विकासकामांना वेग आला आहे. याच पाश्वर्र्भूमीवर उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणार्‍या उड्डाणपूलाचे रखडलेले काम मार्गी लागल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply