Breaking News

‘सीकेटी’त कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय कैडेट कोर विभाग व दृष्टी फाउंडेशन यांच्या समन्वयाने    रविवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता बहुउद्देशीय कागदी पिशव्या कसे बनवायचे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर देवधेकर हे प्रमुख मार्गदर्शक होते. या कार्यशाळेचे उद्घाटन दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर देवधेकर यांनी केले. या वेळी राष्ट्रीय कैडेट कोर विभागाचे प्रमुख एएनओ कॅप्टन डॉ. यु. टी. भंडारे आणि सीटीओ एन. पी. तिदार या उपस्थित होत्या. देवधेकर यांनी कॅडेडना किराणा सामानाची पिशवी, वैद्यकीय पिशवी आणि शॉपिंग बॅग कशी बनवायची या विषयावर सखोल मार्गदर्शन केले आणि ते कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. प्लॅस्टिकऐवजी कागदाचा वापर करण्याबाबत जागरुक व्हा व त्या पिशव्या आजूबाजूच्या दुकानात वितरित करा जेणेकरून त्यांनाही प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जाणीव होईल असेही  त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत 65 कॅडेड सहभागी झाले होते. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय कैडेट विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. यु. टी. भंडारे, सीटीओ निलीमा तिदार आणि एनसीसी  कॅडेड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply