Breaking News

शिरवलीवाडीमधील महिलांनी काढला विहिरीतील गाळ

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडीमधील महिलांनी पुढाकार घेत विहिरीतील गाळ काढला आहे.

शिरवलीवाडीत पवार कुटूंबाची खाजगी विहीर आहे. या विहिरीलगत असलेल्या तलावातून पाझर पद्धतीने विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर इतर दैनंदिन कामाकरिता केला जातो. या विहिरीतील गाळ काढण्यासाठी शिरवलीवाडीतील महिलांनी पुढाकार घेतला.वाडीतील बारा महिला एकत्र आल्या. फावडे, कुदळ, घमेली आणि दोर बांधलेली बादली या साहित्यासह महिलांनी श्रमदानाला सुरुवात केली. वीस फूट खोल विहिरीत उतरून महिलांनी गाळ काढला. या महिलांनी केलेल्या श्रमदानामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आहे.

मजूर घेऊन विहीर साफ करण्यात येणार होती. मात्र आम्ही महिलांनी गाळ काढण्याचा निर्णय घेत, विहिरीची साफसफाई केली. भविष्यात या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य होईल.

-मालती मधुकर पवार, ग्रामस्थ, शिरवलीवाडी, ता. खालापूर

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply