उरण : बातमीदार
खेलो इंडिया अंतर्गत मुलींच्या 17 वर्षाखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उरणची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चकमदार कामगिरी केली.
मुंबई कुलाबा येथील कुपरेज ग्राउंडवर स्पर्धा झाली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फुडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले. त्यांनी मुलींचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रायगड संघाला उपविजेतपद मिळवून देण्यात जिल्हा संघातून खेळणारी उरणची दिव्या नायक हिने मिडफिल्डर म्हणून चांगला खेळ केला. फुटबॉल क्षेत्रात तिचे पदार्पण वयाच्या दहाव्या वर्षी सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणमार्फत झाले. तिचे खेळाबद्दलचे प्रेम आणि उत्साह यशाची गुरुकिल्ली सिद्ध होईल, असे तिचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे यांनी सांगितले,
तर दिव्याचे स्वप्न फुटबॉल जगतात वाटचाल करणे आहे. त्याही पलीकडे तिला भारतासाठी खेळण्याची खूप मोठी इच्छा आहे, असे तिचे वडील दुर्गादास नायक म्हणाले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …