Breaking News

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बार मॅनेजरला मारहाण

पनवेल : वार्ताहर

दारू पिण्यासाठी बारमध्ये बसलेल्या पाच व्यक्तींमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बारच्या मॅनेजरलाच एका व्यक्तीने दगड मारल्याची घटना कळंबोलीतील तारा बारमध्ये घडली. या घटनेतनंतर कळंबोली पोलिसांनी बारच्या मॅनेजरला दगड मारणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, या मारहाणीत बारच्या मॅनेजरला कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली असून, त्याला आठ टाके मारण्यात आले आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अशोक खेडकर (38) असे असून तो व त्याचे इतर चार साथीदार कळंबोलीतील तारा हॉटेल व बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्यामध्ये आपसात वादावादी होऊन भांडण झाले. त्यामुळे बारचा मॅनेजर सुरेश विशे याने सर्वांना बारच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी बारच्या पाठीमागे जाऊन पुन्हा एकमेकांशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील भांडण वाढल्याने बारचा मॅनेजर सुरेश विशे व इतर त्यांचे भांडण सोडविण्यास गेले असता, अशोक खेडकर याने मॅनेजर सुरेश विशे याला जोराने दगड मारला. सदर दगड सुरेशच्या कानाच्या मागे लागून तो जखमी झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी बारमधील इतर कर्मचार्‍यांनी अशोक खेडकर याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी खेडेकर याला मारहाणीच्या गुन्ह्याखाली अटक केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply