तळोजा : रामप्रहर वृत्त
जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीत काम करणार्या कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असून कामगारवर्गाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमदार म्हणून पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
तळोजा एमआयडीसीतील युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास तोंडरे ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील, खैरणे सरपंच शैलेश माळी, सामाजिक कार्यकर्ते हरिशेठ फडके, दिनेश खानावकर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर, संघटक रवींद्र कोरडे, अंकुश पाटील, अशोक साळुंखे, बी. सी. डोंगरे, भगवान ठाकूर, नितेश पाटील, प्रकाश खैरे, चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र गोंधळी, प्रदीप गोंधळी, तळोजा एमआयडीसीमधील जय भारतीय जनरल कामगार संघटना असलेल्या डाऊ केमिकल, हायकल केमिकल, बामन लॉरी, केम्स पेक केमिकल, दीपक नायट्रेट सेल इंडिया आदी कंपन्यांमधील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जितेंद्र घरत व त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी यांचे कामगार चळवळीचे काम व होणारे पगारवाढीचे करार चांगल्या प्रकारे होत आहेत. त्यामुळे हळूहळू तळोजा एमआयडीसी, पाताळगंगा एमआयडीसी व जेएनपीटी परिसरातील कंपन्यांमध्ये आपली संघटना वाढत आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …