Tuesday , February 7 2023

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’ची दमदार कामगिरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत झालेल्या पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी बजावली.
बारावी सायन्समध्ये शिकत असलेले आर्यन अतुल्य स्वायन, रोशन रतन गोरपेकर, ऋतुराज दिलीप वाघमारे यांनी प्रथम, तर वेदांत संजय कणसे (अकरावी सायन्स) आणि ऐश्वर्या लक्ष्मण गोरे (बारावी सायन्स) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय शालेय कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, स्वाती पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply