कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई
कळंबोली : बातमीदार
कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती देतात कळंबोली अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख सदाशिव कवठे यांनी रातोरात उभारलेल्या झोपड्यावर रातोरात धडक कारवाई करून जमीनदोस्त केल्या. कळंबोली वसाहतीत विविध ठिकाणी महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या उभारणे व बेकायदा नागरी वस्ती निर्माण करून बेकायदा अतिक्रमण केले जात आहे. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी विभाग कळंबोली वसाहतीमध्ये अतिक्रमणावर कारवाई करून वसाहत सुंदर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र भूमाफिया या महापालिकेच्या कारवाईला न जुमानता झोपड्या उभारण्याचे काम सुरूच ठेवत आहेत. रोडपाली तलावाच्या बाजूच्या महापालिकेच्या मोकळ्या झाल्यांवर दोन दिवसांपूर्वी रात्रीचे झोपड्या सदृश्य बांबूंनी वेढलेल्या झोपड्या निर्माण करण्याचे काम केले गेले होते. याची माहिती येथील सजग नागरिकांना मिळतात त्यांनी याबाबतची माहिती कळंबोलीतील विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांना दिली. याबाबतची गंभीर दखल घेऊन कवठे यांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचार्यांना रातोरात कारवाई करण्यास भाग पडून रातोरात उभारण्यात आलेल्या झोपड्या रात्रीच जमीनदोस्त केल्या. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला धन्यवाद देत आहेत. अशाच प्रकारचे कारवाई नाल्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या बेकायदा झोपडपट्टीवर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.