पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात विमुक्त-भटके आघाडीची जिल्हा बैठक झाली. प्रदेश सरचिटणीस गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये धन्यवाद मोदीजी या उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली व जास्तीत जास्त पत्र पंतप्रधान मोदीजींना पाठविण्यासाठी गुंजाळकर यांनी आग्रह धरला. त्याचप्रमाणे विमुक्त-भटके आघाडीचे 22 डिसेंबर राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे होणार आहे त्या संदर्भात या अधिवेशनाला जाण्यासाठी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले. मंडळ स्तरावरील सर्व नियुक्त करण्यात याव्यात व विमुक्त-भटके आघाडी जास्तीत जास्त मजबूत करावी यासाठी गुंजाळकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी प्रदेश महिला सरचिटणीस सुहासिनी केकाने यांच्यासह उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका अपर्णा सचिन मोरे व सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे हेही उपस्थित होते. भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्ष विद्या तामखडे, त्याचबरोबर युवा संयोजक डॉ. पवनकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम आखाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सर्वश्री रामा शेंडगे, प्रल्हाद गीते, कळंबोली मंडळ अध्यक्ष आबा घुटुकडे, पनवेल शहर अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, कळंबोली मंडळ उपाध्यक्ष विठ्ठल खरात आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये भटके विमुक्त आघाडीच्या उरण मंडल अध्यक्षपदी अर्जुन डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल सर्वांनी डोंगरे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.