Breaking News

‘चोराच्या मनात चांदणे’

घोडा-मैदान लांब नाही, तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या जगासमोर येईल!

पनवेल : रामप्रहर वृत्त

कुणी एखाद्यावर कितीही शिंतोडे उडविले, तरी जनता सुज्ञ आहे. ती सारे काही जाणते. त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नका. घोडा-मैदान लांब नाही. कोण चूक आणि कोण बरोबर याचा फैसला येत्या सहा महिन्यांत होणार आहे. त्या वेळी तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या जगासमोर येईल. म्हणूनच दैनिक निर्भीड लेखच्या संपादकांनी आतापासूनच आपल्या मर्यादेत राहावे. तेच त्यांच्या भल्याचे ठरणार आहे.

वस्तुस्थिती लक्षात न घेता केवळ शब्दांची फिरवाफिरव करून ‘मोठ्या दुर्घटनेसह जीवितहानीची टीआयपीएलला अपेक्षा आहे का’ असे ‘निर्भीड लेख’ने विचारणे म्हणजे ‘चोराच्या मनात चांदणे’ यासारखेच आहे. आता कुणाला काय हवे आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र ठाकूर कुटुंबीय या संपादक महाशयांसारखे विघ्नसंतोषी नक्कीच नाहीत. ठाकूरांची बांधिलकी जनतेशी असून, जनताही ठाकूरांना नेहमीच आपला कौल देते. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. त्यामुळे कोणाच्या कामाला आणि कोणाच्या बोलण्याला किती किंमत द्यावी, हे जनताच चांगले जाणते. कोण दहशतवाद पसरवतो आणि कोण दिशाभूल करतो याची पूर्ण कल्पनादेखील जनतेला आहे.

याउपर इतिहासच उकरून काढायचा झाला, तर खूप काही बाहेर काढू शकतो, पण आज गुढीपाडव्याचा चांगला दिवस असल्याने तोंड खराब करू इच्छित नाही.

तुमचे माप तुमच्या पदरात आणि आमचे माप आमच्या पदरात. तेव्हा भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात नीट जगा; अन्यथा पळता भुई थोडी होईल.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply