Breaking News

सिडकोनिर्मित इमारती बनल्या धोकादायक

नवीन पनवेलमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे उघड

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील सिडकोने बांधलेल्या 25 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे महापालिकेने सूचना देऊन ही अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या इमारतीत अनेक ठिकाणी नवीन बदल करण्याची कामे सुरू आहेत काही ठिकाणी छताचे प्लास्टर पडत आहे. या इमारतींवर महापालिका कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नवीन पनवेलमध्ये सिडकोने विविध उत्पन्न गटासाठी 25 वर्षा पूर्वी इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी सिडकोने त्या इमारतीची जागा 60 वर्षांच्या भाडे कराराने दिली आहे. सिडकोच्या या इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. या मधील पी-6, सी-5 व सी-6 मध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त सदनिका या सिडकोच्या अधिकार्यांच्या आहेत. त्या भाड्याने दिलेल्या आहेत. याठिकाणी  गृह निर्माण संस्था न करता आठ ते दहा इमारती मिळून एक असोसिएशन स्थापन करण्यात आले आहे.

या इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. अनेकांनी मूळ आराखड्यात बदल करून रूम वाढवल्या आहेत. अनेक रूममध्ये छताचे प्लास्टर पडत आहे. त्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. काही मालक बसवलेल्या लाद्या काढून नवीन बसवत आहेत. तर काहींनी कॉलम फोडून त्यातील स्टील बदलले आहे. त्यामुळे मूळ इमारतीच्या स्ट्रक्चरला धक्का बसलेला आहे. हा भाग पनवेल महापालिकेमध्ये आल्यावर महापालिकेने सिडकोला इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पत्र दिले होते, पण अद्याप  त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही.

सिडकोच्या पनवेलमधील विविध उत्पन्न गटातील इमारती

पी-6-36

बिल्डिंग सी-5-36

बिल्डिंग सी-6-12

बिल्डिंग बी-10-14

बिल्डिंग ई-10 बिल्डिंग

व ए टाईप -100

महापालिकेने सांगून ही इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही ही धक्कादायक बाब आहे. मी आज कोर्ट कामासाठी पुण्याला आलो आहे. उद्या याबाबत माहिती घेऊन त्वरित कारवाई करतो. -कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका

पनवेल महापालिकेने सिडकोला इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत पत्र दिले होते. त्या प्रमाणे आम्ही प्रत्येक असोसिएशनला ऑडिट करण्यास पत्र दिले आहे, पण ते कोणी ही केलेले नाही. -संतोष साळी, ए.ई.ई. सिडको

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply