Breaking News

सीकेटी महाविद्यालयात अतिथी व्याख्यान

पदवीधारक विद्यार्थ्यांना औद्योगिकदृष्ट्या मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे पदवीधारकांकडून औद्योगिक अपेक्षा याविषयावर अतिथी व्याख्यान शनिवारी (दि. 10) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे संस्थापक, कॉलिटी सोलुशन लॅबोरेटरी बेलापूर श्याम नारायण कोळी, संस्थापक आणि सी. ई. ओ. एडूकेअर ग्लोबस यु.के दीपक पारधी व सह-संस्थापक एडूकेअर ग्लोबस यु.के. प्रवीणकुमार भिसेन उपस्थित होते.

या व्याखानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. बी. व्ही. जाधव यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच विभागाचे सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. जे. एस. ठाकूर यांनी महाविद्यालयाची माहिती सांगून केली. तसेच या वेळी प्रो. डॉ. बी. व्ही. जाधव यांनी रसायनशास्त्र विभागाची माहिती दिली.

उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांनी उद्योगधंद्यामध्ये यशस्वीरित्या काम करण्यासाठी पदवीधरांकडे कोणती कौशल्ये असणे आवशयक आहे याचे विस्तृत विवेचन केले. तसेच विविध उद्योगधंद्यामध्ये रसायनशास्त्रासंबधी असलेल्या संधींची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागाचे प्रा. आर. एन. पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply