Breaking News

ख्रिस गेल खेळणार पाचव्यांदा विश्वचषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणार्‍या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील 19 वा खेळाडू ठरेल. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण 16 असे खेळाडू आहेत की त्यांनी 5 विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यात ब्रायन लारा, इम्रान खान, अर्जुन रणतुंगा, मुथय्या मुरलीधरन, वसीम अक्रम, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आदींचा समावेश आहे. गेल, लारा व शिवनारायण चंद्रपॉल यांच्यानंतर या पंक्तीत स्थान मिळवणारा तिसरा कॅरेबियन खेळाडू ठरेल.

भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सात खेळाडू चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळतील. धोनी 2007 पासून या स्पर्धेत खेळत असून 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. त्याने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत 20 सामन्यांत 507 धावा व 32 बळी घेतले आहेत.

बांगलादेशचे चार खेळाडू चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यात कर्णधार मशरेफी मुर्तजाचाही समावेश आहे. तो गेलनंतर एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने 2003च्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, पण तो 2011 मध्ये संघाचा सदस्य नव्हता. या व्यतिरिक्त मुशफिकुर रहीम, शाकिब-अल-हसन व तमीम इक्बाल 2007 पासून तिन्ही विश्वचषक स्पर्धेत खेळलेले आहेत.गेल आतापर्यंत 2003, 2007, 2011 आणि 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेला आहे. त्यात त्याने 26 सामन्यात 37.37 च्या सरासरीने 944 धावा केल्या आहेत.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply