Breaking News

रोठा सुपारीने श्रीवर्धनची ओळख

सुपारी हे कोकणातील एक नगदी बागायती पीक असून त्याच्या लागवडीखाली महाराष्ट्रात सुमारे 2400 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या ठिकाणी संशोधन करून त्याची जात ठरविली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी ही देशामध्ये प्रसिद्ध असून ती मोठ्या जातीची आहे.

श्रीवर्धनच्या या रोठा सुपारीमध्ये पांढर्‍या गराचे प्रमाण अधिक असून ती मऊ आहे. सुपारी दिसायला सुद्धा आकर्षक असुन साखरेचे प्रमाण 2 ते 3 टक्के आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारीला अधिक दर मिळतो. अजूनही श्रीवर्धनच्या रोठा सुपारीला राज्यभरामध्ये अधिक मागणी असून पहिली पसंती श्रीवर्धनच्या रोठा सुपारीला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, वेळास इत्यादी ठिकाणी सुपारी व नारळाच्या मोठमोठ्या बागायती असल्याने श्रीवर्धन तालुक्यामध्ये व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणात येत असतात.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारा व तेथील असणारी माती ही या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सुपारीवर मुख्यत्वे करून बांड या रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बांड हा मराठी शब्द असून त्याचा अर्थ वांझ किंवा नापीक असा आहे. या रोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे पानांचा चकाकणारा हिरवा रंग जाऊन पाने गर्द हिरवट दिसू लागतात. पानापेक्षा जाड आणि ठिसूळ बनतात. नंतर निघणारा तुरा आखूड आसतो. नवीन पानांचा आकार कमी कमी होत जातो. त्यानंतरच्या अवस्थेत पान ब्रशसारखे अगर सुरकुत्याप्रमाणे दिसते. जसजशी पाने आखूड येऊ लागतात, तसतसा झाडाच्या शेंड्याकडील भाग आवळला जातो. वरचा भाग पेन्सिलच्या टोकाप्रमाणे दिसू लागतो. येणारा फुलोरा लहान लहान निघत जातो. हळूहळू झाडांची फळधारणा शक्ती कमी होऊ त्याला अजिबात फळे येत नाहीत आणि काही वर्षानी झाड मरते.

यासंबंधीचे अन्वेषण 1953पूर्वी मुंबई राज्यातील कृषी विभागाने घेतले होते. या अन्वेषणाद्वारे असे निर्दशनास आले की, हा रोग जमिनीच्या मातीशी निगडित असावा, तसेच कृषी शास्त्रज्ञांच्या मते हा रोग बुरशी किंवा सूक्ष्म जीवामुळे होत नसून तो अनांशचे कमतरतेमुळे होत असावा. तरी या रोगासंबंधी अधिक संशोधन व्हावे म्हणून राज्य शासनाने जून 1953 साली बांड रोग संशोधन केंद्र म्हणून ही योजना सुरू केली.

त्यानंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेत सदर योजना अखिल भारतीय नारळ आणि सुपारी सुधार प्रकल्प यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या योजनेला त्या वेळी भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली यांच्यामार्फत 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पाचव्या पंचवार्षिक योजनेत हे अनुदान 75 टक्क्यांवर आणण्यात आले व 25 टक्के देण्यात आले. त्यानंतर सहाव्या पंचवार्षिक योजनेत मदत देण्यात आली, मात्र सातव्या पंचवार्षिक योजनेत भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून मिळणारी मदत बंद झाली. सुपारीच्या धंद्यातील भाषा अतिशय प्रासादिक, सहज, सोपी, स्पष्ट व यथार्थ मागदर्शन करणारी आहे. त्यामुळे आणखी नव्याने सुपारीची सधन लागवड करू इच्छिणारे या क्षेत्रात आले तर त्यांना निश्चित याचा लाभ उठविता येईल आणि पर्यायाने हे सुपारीचे क्षेत्र अधिकाधिक वैभवशाली होत राहील यात शंका नाही. त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यातील दर्जेदार सुपारी म्हणून तिचा 1995 पासून तर अधिकाधिक प्रसार करण्यात आला.

श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी नारळ व मसाल्याच्या पिकांना समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी असल्यामुळे या ठिकाणी बारमाही पिके घेता येतात. सुपारीच्या पिकास आवश्यक लागणारी 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान हे या ठिकाणी मिळत असते, मात्र पेरणी लागवडीचा कालावधी प्रति एकर बियाणे पीक व्यवस्थापन, पिकाचा कालावधी उत्पादकता इत्यादी गोष्टीवर अधिक भर दिल्याने पिके उत्तम व दर्जेदार काढता येतात. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या ठिकाणी दरवर्षी 6 ते 7 हजार रोपे उपलब्ध करून दिली जातात. 20 ते 25 हजार बियाणे त्याची लागवड करून झाल्यावर ते रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये ते रोपे पाठविली जातात. श्रीवर्धनमधील जमीन ही मसाल्याच्या पिकासाठी अतिशय उपयुक्त असल्याने या ठिकाणी काळीमिरी, जायफळ, डालचिनी याची 1500 ते 2000 रोपांची लागवड केली जाते. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारा हा मसाल्याच्या पिकासाठी माहेरघर म्हणून संबोधले जाते. दरवषी सुपारी 5 ते 7 लाख रूपयाचा फायदा श्रीवर्धनच्या संशोधन केंद्राला मिळाला जातो.

जमीन :- या पिकास समुद्रकाठच्या वाळूच्या गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणार्‍या बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात.

हवामान  :- पिकास 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान मानवते.

पेरणी लागवडीचा कालावधी :- रोपांची शक्यतो जून महिन्यात लागवड करावी. पाणी साचण्याची शक्यता असणार्‍या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड करावी.

प्रति एकर बियाणे व पीक व्यवस्थापन :- 548 रोपे प्रति एकर लागवड करावी, लागवडीसाठी 60 सेंमी आकराचे खड्डे 2.7 मीटर अंतरावर खणून खड्ड्यामध्ये उपलब्ध पालापाचोळा 20 किलो शेणखत कंपोस्ट 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट 60 ग्रॅम 5 टक्के कार्बरिल भ्ाुकटी आणि चांगली माती टाकावी. सपारीस खताचा पहिला हप्ता ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात घ्यावा. दुसरा हप्ता डिसेंबर, जानेवारी महिन्यात.

पहिला हप्त्ाा एक घमेले शेणखत कंपोस्ट खत अधिक 12 किलो हिरवळ खत अधिक 160 ग्रॅम युरिया, 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा घ्यावा. खते झाडाच्या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंमी खोल आणि 20 सेंमी रूंदीच्या खड्ड्यात बांगडी पद्धतीने घ्यावीत.

पाणी व्यवस्थापन व किड व्यवस्थापन :- जमीन आणि हवामानानुसार उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी घ्यावे. देवी किंवा खवेल किड या किडीचा प्रादूर्भाव क्वचित प्रसंगी मोठ्या प्रमाणात अढळतो. ही किड सुपारी फळाच्या सालीमधून रस 60 सेमी खोल आणिक 45 सेमी रूंदीचे चर खणावेत पावसाळ्यात पावसाचा 8 ते 15 दिवस खंड पडल्यावर पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात वाढणारी फळे तडकून गळून पडतात. त्यासाठी अशा वेळी खंडाच्या काहात पाणी द्यावे, तसेच बोराक्सचे 0.5 टक्के द्रावण झाडावर फवारावे.

पिकाचा कलावधी, उत्पादकता, विशेष गुणधर्म :- वयाच्या पाचव्या वर्षापासून उत्पन्न सुरू होते. सुमारे 90 टक्के ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात तयार होते. वयोमानाप्रमाणे दरवर्षी एका झाडापासून 3 घड मिळतात व त्यापासून 2 ते 2.5 किलो असोली सुपारी मिळते. या जातीची सुपारी मोठ्या आकाराची असून तिच्यामध्ये पांढर्‍या गराचे प्रमाण अधिक असून ती मऊ आहे. सुपारीचा आकार आकर्षक असल्याने त्यास अधिक दर मिळतो. काळेरेग, आंळबी किंवा मुळ कुजरो, बॉडरोग इत्यादी प्रकारचे सुपारीवर रोग होत असतात. त्याची निगा व योग्य वेळी फवारणी केल्यास बुरशीजन्य रोग नाहीसे होतात.

-भारत चोगले, श्रीवर्धन

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply