Tuesday , February 7 2023

भाजपप्रणित जनशक्ती आघाडीला निवडून द्या -ना. रवींद्र चव्हाण

पाली : प्रतिनिधी

राज्य व देशाच्या प्रगतशिल वाटचालीत सत्ताधारी भाजप युती सरकारचे योगदान महत्वपुर्ण ठरत आहे. मागील अनेक वर्ष विकासापासून वंचीत असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगिण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबध्द आहे. शिहू ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावांना मुलभूत सेवासुविधा पुरविण्याबरोबरच सर्वांगिण विकास साधण्यासाठी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित जनशक्ती आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पालकमत्री रविंद्र चव्हाण यांनी शिहू येथे केले.

भाजपप्रणीत जनशक्ती आघाडी शिहू ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक लढवित असून, थेट सरपंचपदासाठी आघाडीच्या कृष्णी केशव म्हात्रे या निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. या उमेदवारांच्या प्रचारसभेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. केंद्रातील आदर्श गाव योजनेप्रमाणे राज्यात आमदार आदर्श गाव योजना सुरु करण्यात आली असून, या योजने अंतर्गत शिहू गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. जनशक्ती आघाडीच्या या प्रचार सभेला भाजपचे अलिबाग विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, यशवंत ठाकूर, आनंद लाड, हिरामण कोकाटे, वसंत मोकल, प्रकाश मोरे आदिंसह  पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

शिहू ग्रामपंचायत निवडणूकीतील जनशक्ती आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी हिरामण कोकाटे, वसंत मोकल, लक्ष्मण खाडे, भास्कर म्हात्रे, जयश्री जगदिश कोकाटे, गणपत खाडे, सुषमा कुथे, अनंत भुरे, दिपक पाटील, मयूर मोकल, शोभा घासे, अनिता पुंडलीक घासे, पांडुरंग लोभी, पुनम भुरे, दत्ताराम पाटील, खेळ्या घासे, नरेश कोकाटे, के. के. कुथे, यशवंत घासे, देवराम कुथे, मनोज पाटील आदिंसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply