Breaking News

कोरोना लशीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून -केंद्र सरकार

मुंबई : प्रतिनिधी

भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे.  13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. आरोग्य कर्मचार्‍यांना आतापर्यंत केवळ पहिलाच डोस देण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. पॉल यांनी दिली.

द इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (खउचठ) या संस्थेतर्फे सांगण्यात आलं की, तिसर्‍या देशव्यापी सेरो सर्वेक्षणानुसार देशाच्या बर्‍याच मोठ्या लोकसंख्येला अद्याप कोविड-19 चा धोका आहे. 17 डिसेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येपैकी 21.5 टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला होता, असे आढळले.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, 19 दिवसांत सुमारे 45 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला आहे. ’अनेक देशांनी लसीकरण मोहीम सुरू करून 65 दिवस होऊन गेले आहेत. भारतात 16 जानेवारीपासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले.  दररोज लसीकरण होणार्‍यांच्या संख्येतही वाढ होत आहे, असेही मंत्रालयाने सांगितलं.

24 तासांच्या कालावधीत आठ हजार सत्रांमध्ये तीन लाख 10 हजार 604 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत लसीकरणाची 84 हजार 617 सत्रं पार पडली आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचार्‍यांसह कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत ज्येष्ठ नागरिक, तसंच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply