Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; तयारी पूर्ण

अलिबाग ः प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 20) होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया झाली होती. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाली होती. त्यापैकी 49 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने रविवारी 191 ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. तुरळक प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली. सरपंचपदाच्या 472, तर सदस्यपदाच्या  2464 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यातील काही नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, ठाणे, सुरत या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. त्यातील अनेकांची नावे आपापल्या गावाकडील मतदार यादीत आहेत. या मतदारांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मतदानानंतर आता निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply