Breaking News

कर्जतमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढणार्‍या नवरदेवाकडून आधी मतदान

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) मतदान झाले. वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये पोसरी येथील मतदान केंद्रावर चक्क बोहल्यावर चढण्यास निघलेला नवरदेव आधी मतदान आणि नंतर लग्न असे ठरवून मतदान केंद्रावर पोहचला. सुमारे 90 टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यातील उकरुळ, मांडवणे, कोंडीवडे, वावळोली, कळंब, दहीवलीतर्फे वरेडी आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच आणि तेथील 54 सदस्यपदासाठी मतदान झाले. सात ग्रामपंचायतींमधील थेट सरपंचपदासाठी 20 उमेदवार रिंगणात असून सात ग्रामपंचायतीमधील एकूण 69 सदस्यांपैकी 15 सदस्य बिनविरोध निवडले असल्याने 54 जागांसाठी मतदान घेण्यात आले. निलेश रामदास शिर्के यांचे रविवारी लग्न असून पोसरी गावातील या तरुण मतदाराने आज आपल्या लग्नाची वेळ समीप आलेली असतानादेखील मतदान केंद्रावर जावून रांगेत उभे राहून मतदान केले. त्यावेळी पोसरी मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले तेथील ग्रामस्थ कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनीदेखील या तरुण मतदाराचे कौतुक केले.

101 वर्षांच्या आजीने केले मतदान

दहीवलीतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीमधील दहीवली गावातून प्रभाग 1 मधील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर भागीरथी जैतू तरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे वय 101वर्षे असून त्यांना त्यांचे पुत्र मतदान केंद्रावर घेऊन आले, मात्र त्या आजींनी मतदान यंत्रात स्वतः मत नोंदवले.

उमेदवार चक्कर येऊन पडले

कळंब ग्रामपंचायतमधील बाळासाहेबांची शिवसेनेकडून सरपंचपदाची निवडणूक लढविणारे उमेदवार रामचंद्र बदे यांना मागील 15 दिवसांत प्रचार आणि जागरण याचा त्रास झाला होता. त्याचा परिणाम मतदान सुरू असताना त्यांचा रक्तदाब वाढला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना बदलापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply