Breaking News

गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना    

बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गावांमधील प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात सिडको अभियंत्यांना सुचनावजा मागणी केली.

गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा या गावांना सिडकोकडून पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि विकासकामे मार्गी लावावीत या संदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडको प्रशासनासोबत बैठक घेतली. गावांमध्ये शाळा, पाण्याची टाकी, अंतर्गत गटारे, रस्ते काँक्रिटीकरण करणे, विद्युत लाईन, स्मशानभूमी, तलावांवर ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच पत्रा शेड व ओपन जीम इत्यादी सुविधा करण्यात याव्यात या मागणीसाठी बैठक घेण्यात आली. गावांतील सोयीसुविधांवर सविस्तर चर्चा करून विकासकामे लवकर मार्गी लावावीत, अशा सूचनावजा मागणी सिडको प्रशासनाकडे करण्यात आली.

या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह सिडकोचे सीई गोसावी, एक्झुकेटिव्ह इंजिनिअर पितळे, असिस्टंट इंजिनिअर भावे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, सुनिता घरत, उषा देशमुख, कामिनी कोळी, जयवंत देशमुख तसेच सुहास भगत आदी उपस्थित होते.

 

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply